पुरस्कारांमध्येही “झिरो पेंडन्सी’ करण्याचा संकल्प

जिल्हा परिषदेने चार वर्षांचा बॅकलॉग भरून काढला

पुणे- जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध विभागांकडून पुरस्कार दिले जातात. मात्र, मागील काही वर्षांपासून हे पुरस्कार जिल्हा परिषदेकडून दिलेच नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने यावर्षी मागील तीन ते चार वर्षातील “बॅकलॉग’ भरून काढत सर्वंच विभागाकडून पुरस्कार जाहीर करण्यात आले. सध्या जिल्हा परिषदेमध्ये झिरो पेंडन्सी जोरात सुरू आहे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने पुरस्कारामध्येही “झिरो पेंडन्सी’ करण्याचा संकल्प केल्याचे पहायला मिळत आहे.

महिला व बालकल्याण, बांधकाम आणि आरोग्य, समाजकल्याण यासह कृषी आणि पशु विभागाकडून दरवर्षी पुरस्कार जाहीर केले जातात. त्यामध्ये आदर्श सरपंच, अंगणवड्या, सेविका, मदतनीस, आरोग्य, शेतकरी असे विविध पुरस्कार दिले जातात. पुरस्कार हे निमित्त असते. मात्र, त्या पुरस्कारामधून व्यक्तीला प्रेरणा आणि आनंद मिळतो. यासाठी जिल्हा परिषदेने हे पुरस्कार सुरू केले आहे. मात्र, या सर्वच विभागाकडून मागील तीन ते चार वर्षांपासूनचे पुरस्कार जाहीरच केले नसल्याचे समोर आले. दरम्यान, या वर्षी 2018 मध्ये अत्तापर्यंत महिला व बालकल्याण, आरोग्य या विभागाकडून शेकडो पुरस्कार देण्यात आले. आता कृषी विभागाकडूनही मागील बॅकलॉग भरून काढत एकदम तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर केले आहेत.

कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या “आदर्श कृषीग्राम पुरस्कार’ आणि “कृषी भूषण डॉ. अप्पासाहेब कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराला अखेर महूर्त मिळाला आहे. गेल्या तीन वर्षातील पुरस्काररार्थींची नावे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी मंगळवारी जाहिर केली. कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी आंबेगाव तालुक्‍यातील काढापूर बुद्रुक येथील अंजली घुले, पुरंदर तालुक्‍यातील पांडेश्वर येथील सुमन झेंडे आणि मुळशी तालुक्‍यातील पिंपळोली येथील नवनाथ शेळके अशी पुरस्कार प्राप्त शेतक-यांची नावे आहेत.

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग करून भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी जिल्हा परिषदेकडून हे पुरस्कार देण्यात येते. 2014 ते 2017 या तिन्ही वर्षातील या पुरस्कारांची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, कृषी व पशूसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, समाज कल्याण विभागाच्या सभापती सुरेखा चौरे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती राणी शेळके उपस्थित होते.

शरद आदर्श कृषीग्राम पुरस्कारासाठी जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील डोंगरी आणि पूर्व भागातील एका ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. 2014 या वर्षासाठी पश्‍चिम भागातील खेड तालुक्‍यातील कान्हेवाडी ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. तर पूर्व भागासाठी दौंड तालुक्‍यातील मलठण ग्रामपंचयातीची निवड करण्यात आली आहे. 2015-16 या वर्षासाठी पश्‍चिम भागासाठी भोर तालुक्‍यातील हातवे खूर्द तर पूर्व भागासाठी हवेली तालुक्‍यातील कोंढणपूर ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. 2016-17 या वर्षासाठी आंबेगाव तालुक्‍यातील रांजणी ग्रामपंचयातीची तर पूर्व भागासाठी इंदापूर तालुक्‍यातील काटी गावाची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, दर वर्षी जिल्ह्यातील 13 गटातून प्रत्येकी 1 या प्रमाणे 13 सर्वसाधारण गटातील प्रत्येकी एक कृषीनिष्ठ शेतकरी, आदिवासी गटातून 3 कृषीनिष्ठ शेतक-यांची निवड करण्यात आली आहे. अशा 15 जनांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. डॉ. अप्पासाहेब पवार स्मृती पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याला 11 हजार तर उर्रवरित शेतक-यांना 5 हजार रूपये देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)