पुरवठा अधिकारी नरहरी शेळके एसीबीच्या जाळ्यात

बीड: बीड शहरातीलच एका परवानगी रद्द केलेल्या स्वस्त धान्य दुकानाला पूर्ववत मान्यता देण्यासाठी एक लाख पंधरा हजार रूपयांची लाच एका कर्मचाऱ्या मार्फत स्विकारली असल्याने लाचखोर जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके याला गुरूवारी एसीबीने पकडले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड शहरातील पालवण चौकातील एका स्वस्त धान्याची परवानगी पूर्ववत करण्यासाठी नरहरी शेळके याने दोन लाख रूपये लाच मागितली  होती . हे प्रकरण मागील तीन महिन्यापासून सुरू होते. पूर्वी एक लाख रूपये संबंधीत स्वस्त दुकानदाराने दिले होते. मात्र तेव्हा एसीबीने लावलेला ट्रॅप सफल झाला नव्हता. अर्धे पैसे देणे बाकी असल्याने गुरूवारी पैसे देण्याचे ठरले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  ठरलेल्या वेळेप्रमाणे ट्रॅप लावला.

पैसे घेण्यासाठी पुरवठा विभागातील कर्मचारी बब्रुवान फड याला पाठविले. बब्रुवान फड याने एक लाख पंधरा हजार रूपये असतील तरच तुमचे काम होईल असे सांगत एक लाखात अजून पंधरा हजार रूपये वाढवून सांगितले. पंधरा हजार हे माझ्यासाठी व एक लाख शेळके साहेबांना द्यावे लागतील असे सांगत. शेळके याला फोन लावून विचारले की, पुढची पार्टी पैसे देतेय घेवून का? यावर शेळके याने घे म्हटल्यावर फड याने एक लाख पंधरा हजार रूपये स्विकारले. पैसे घेताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  फड याला ताब्यात घेतले. हा सापळा पोलिसांनी माने कॉम्पलॅक्स जवळील उद्यानाच्या परिसरात लावला होता. यानंतर पुरवठा अधिकारी नरहरी शेळके याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.नरहरी शेळके याच्या संपत्तीची देखील कसून चौकशी केली जात आहे. त्याचे औरंगाबाद शहरात दोन वेगवेगळ्या भागात घरे आहेत. त्याच्या त्या दोन्ही घरी एसीबी ची पथके चौकशीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

नरहरी शेळके याच्यावर निवासी उप जिल्हाधिकारी , औरंगाबादला असताना अनेक प्रकरणांमध्ये चौकशाी सुरू होती. या चौकशीत शेळके दोषी आढळल्याने बुधवारी राज्यसरकाने सक्तीने सेवा निवृत्ती संदर्भात लेखी पत्र बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले होते. पंधरा दिवसात शेळके याचे म्हणणे शासनाने मागविले होते. या सर्व प्रकरणांरून शेळके याच्या लक्षात आले की, आता आपण पंधरा दिवसाने सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे. म्हणून नरहरी शेळके याने बब्रुवान फड व अन्य एक पुरवठा विभागातील महिला (नाव समजू शकले नाही) यांना तात्काळ पैसे वसूल करा असे सांगितले होते. अशी माहिती सूत्रांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)