पुरंदर विमानतळ बाधितांना योग्य मोबदला देणार

स्थानिक युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देणार

पुणे- पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे 2700 ते 2800 हेक्‍टर जागेची गरज आहे. यासाठी भूसंपादन करताना त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांवर व्हायला नको, हे सरकारचे धोरण आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जाणार आहे. येथील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारही उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघात राव बोलत होते. जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे 11 ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर ही जागा निश्‍चित करण्यात आली. हा विमानतळ 6 किलोमीटर लांबी तर 3 किलोमीटर रुंदी या परिघात होणार आहे. यासाठी परवानगी देताना संरक्षण विभागाने धावपट्टी (रनवे) ही पूर्व-पश्‍चिम या दिशेस असावी, अशी अट घातली आहे.

त्यानुसारच ही धावपट्टी असेल. पुरंदर येथे विमानतळ झाल्यावर लोहगाव विमानतळावरून टेक-ऑफला काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यात आला. लोहगाव आणि पुरंदर विमानतळाचा “कॉमन एअर स्पेस’ आहे. पुरंदर विमानतळाचे भूसंपादन आणि प्रत्यक्ष विमानतळ सुरू होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील. तोपर्यंत या गावांमधील युवक-युवतींना विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आराखडा करण्यात येत आहे. याठिकाणी रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे. त्याठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. हा एक पुर्नवसन धोरणाचा एक भाग असल्याचे राव यांनी सांगितले.

लोहगाव संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे
लोहगाव विमानतळावरून रोज 110 प्रवासी विमाने ये-जा करतात. तर संरक्षण विभागाची फक्त 8 विमानेच ये-जा होते. लोहगाव विमानतळावरून 92 टक्के उड्डाणे ही नागरी आहेत. तर संरक्षण विभागातील 8 टक्के विमानांचे उड्डाण होते. लोहगाव विमानतळ संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मुंबईवरील संरक्षणाची जबाबदारी लोहगाव विमानतळावरील हवाई दलाकडे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)