पुरंदर विमानतळ परिसर “एअरपोर्ट सिटी’ होणार

लवकरच भूसंपादन : “लोहगाव’चेही विस्तारीकरण सुरू

पुणे – शहराला स्वतंत्र असे नवीन विमानतळ महत्त्वाचे आहे. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास केला जाईल. जेणेकरून या परिसरात “एअरपोर्ट सिटी’ तयार होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.

-Ads-

बालेवाडी येथील क्रीडा संकुलात “पीएमआरडीए’च्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच सुरू करण्यात येईल. तीन-चार सरकारी कंपन्या एकत्रित येऊन विमानतळाचे नियोजन करण्यात येणार आहे. यातून या ठिकाणी अधिकाधिक गुंतवणूक वाढेल. यासाठी तीन-चार सरकारी कंपन्या एकत्रित येत आहे. हा विषय अंतिम टप्प्यात आहे.

भूसंपादनाविषयी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. भूसंपादनाचे मॉडेल तयार केले आहे. यावर लवकरच निर्णय घेऊ,’

पुण्यासाठी विमानतळ महत्त्वाचे आहे. नवीन विमानतळ उभे राहण्यासाठी पाच वर्षे लागतील. तोपर्यंत सध्या असलेले लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वाढत्या प्रवाशांना ते सोयीचे होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

प्लॉट विक्री फलक कसेकाय?
मध्यंतरी एका कार्यक्रमासाठी पुरंदर तालुक्‍यात गेलो असताना तेथे विमानतळाच्या जवळ प्लॉट विक्रीसाठी असे फलक लागले होते. अजून विमानतळाचे भूसंपादनाचे काम नाही आणि प्लॉट विक्रीचे फलक लावले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)