पुरंदर विमानतळ जागेला विविध विभागांची मान्यता

संग्रहित छायाचित्र

पुणे – पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेला संरक्षण विभाग, वित्त, नागरी हवाई वाहतूक संचालनालय, गृह विभाग, निती आयोग आदी विभागांनी मंजुरी दिली आहे. याबाबत दिल्ली येथे उच्चस्तरीय समितीची बैठक सोमवारी पार पडली. त्यामुळे पुरंदर येथे विमानतळ उभारण्याच्या कामास गती मिळणार आहे.

पुरंदर विमानतळासंदर्भात झालेल्या बैठकीला संरक्षण विभाग, गृह विभाग, वित्त विभाग, निती आयोग, नागरी हवाई वाहतूक संचालनालय, एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. एप्रिलमध्येच या संदर्भात दोन बैठका झाल्या आहेत. तसेच विमानतळासाठी विविध विभागांची परवानगी मिळविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.

सोमवारी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत पुरंदर विमानतळाच्या जागेला सर्व विभागांकडून मान्यता दिली आहे. याविषयीचे अधिकृत पत्र लवकर मिळणार असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी सांगितले. दरम्यान, बैठकीच्या सुरुवातीस पुरंदर विमानतळ संदर्भात एक सादरीकरण करण्यात आले. यामध्ये विमानतळाची जागा, रोडची कनेक्‍टिविटी, पाण्याची उपलब्धता, जमिनीची प्रतवारी आदींची माहिती यावेळी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)