पुरंदर विमानतळासंदर्भात आज बैठक

खळद-पुरंदर तालुक्‍यातील प्रस्तावित विमानतळासंदर्भात बाधीत गावातील शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी शनिवारी (दि. 20) तहसीलदार पुरंदर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बाधीत गावातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार सचिन गिरी यांनी केले.
गेल्या तीन दिवसांपासून या संबंधित गावांमध्ये महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अधिकार अभिलेखांचे अद्यावतीकरणाचे काम सुरू असून याला या गावांतून तीव्र विरोध होत आहे. संतप्त नागरिक हे काम बंद पाडत आहेत. यावेळी या नागरिकांनी आम्हाला विमानळाला आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत, तरीही हा मोजणीचा फार्स कशाला, काही झाले तरी आम्ही मोजणी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी संबंधित सर्व गावातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्‍त समितिचे अध्यक्ष व इतर प्रमुख, शेतकरी यांनी तहसील कार्यालय पुरंदर येथे सकाळी 11 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)