पुरंदर विमानतळाच्या जमिनींवर लवकरच खरेदी- विक्रीच्या व्यवहारांवर बंदी

प्रभात वृत्तसेवा

पुणे- पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सात गावातील 2 हजार 367 हेक्‍टर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर लवकरच बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

राज्य शासनाने नुकतीच पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शासनाने मान्यता दिली आहे. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनास मान्यता देण्याबरोबरच शासनाने वित्तीय मान्यता सुध्दा दिली आहे. विमानतळासाठी 2 हजार 367 हेक्‍टर जागेची आवश्‍यकता असून भूसंपादनासाठी शासनाने 3 हजार 513 कोटींच्या खर्चासही मंजूरी दिली आहे. त्यामुळे पुरंदर येथे विमानतळ उभारण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या सात गावांमधीलल सुमारे 2 हजार 367 हेक्‍टर जमीनीचे संपादन करावे लागणार आहे. यासाठी अधिसूचना निघणे बाकी आहे. ही अधिसूचना मे महिना अखेर पर्यंत निघणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या जागेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर लवकरच बंदी आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. विमानतळासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना विश्‍वासात घेण्यात येईल. विमानतळासाठीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांसमोर मांडण्यात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)