पुरंदर विमानतळबाधितांचे नुकसान होणार नाही

जिल्हाधिकारी राम


थेट जमीन खरेदी, पुनर्वसनाचे पर्याय


आठवडाभरात शेतकऱ्यांसमोर पर्याय मांडणार

पुणे- पुरंदर येथे प्रस्तावित असलेल्या विमानतळाच्या भूसंपादनाच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या आठवडाभरात शेतकऱ्यांना मोबदल्याचे पर्याय दिले जातील. शेतकऱ्यांना मान्य असेल तेच करणार. शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.

राम म्हणाले, शहराच्या मानाने पुण्यात योग्य विमानतळ नाही. गेल्या दहा वर्षांपासून पुणे विमानतळाचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यामुळे या प्रश्‍नाला प्राध्यान्यक्रम देण्यात येणार आहे. विमानतळासाठी सुमारे 2 हजार 300 हेक्‍टर जमीन संपादित करावयाची आहे. भविष्यातील मागणीनुसार आणखी जमीन लागू शकते. भूसंपादनामुळे 1 हजार 118 कुटुंबांची घरे बाधित होणार आहेत. प्रकल्प बाधितांना मोबदला देण्यासाठी 2013चा कायदा आणि 2015चा अध्यादेश समोर ठेऊन विचार करण्यात येणार आहे. कायद्यानुसार दर निश्‍चिती करणे अथवा अध्यादेशानुसार थेट जमीन खरेदी करणे आणि पुनर्वसन असे पर्याय आहेत.

भूसंपादनापोटी काय मिळणार, याची माहिती शेतकऱ्यांना नाही. ते समजायला पाहिजे. त्यासाठी येत्या आठवडाभरात मोबदल्याचे पर्याय शेतकऱ्यांसमोर मांडण्यात येतील. त्यानंतर भूसंपादनासाठी शेतकऱ्यांची संमती घेण्यात येईल. शेतकऱ्यांना मान्य असेल असा प्रस्तावच घेण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांचा तोटा होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

भूसंपादनाचे प्रश्‍न लागणार मार्गी
राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे विभाग या कामांसाठी भूसंपादन करावयाचे आहे. त्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय राखला जाईल. कामे वेळेत होण्यासाठी कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

भूसंपादन मोबदला

सध्यस्थितीत भूसंपादनासाठी 2013 चा कायदा आहे. यामध्ये भूसंपादनासाठीचे दर निश्‍चित केले आहे. तर राज्य शासनाने 2015 मध्ये काढलेल्या अध्यादेशाद्वारे प्रकल्पांसाठी थेट जमिनींची खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले….
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीप्रमाणे स्वच्छ, सुंदर प्रशासनावर भर
प्रत्येक नागरिकाला भेट देणार, तक्रार निवारण प्रणाली उभारणार
कामचुकार अधिकाऱ्यांना शिस्त लावणार
प्रशासकीय पातळीवर नागरिकांना त्रास होणार नाही.
शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)