पुरंदर तालुक्‍यात ढगाळ वातावरण

गराडे -पुरंदर तालुक्‍यामध्ये आज शुक्रवारी (दि. 19) दिवसभर ढगाळ वातावरण होते. मागील पंधरा दिवसांपासून हवामानामध्ये झपाट्याने बदल झाला आहे. पाऊस कधीही येऊ शकतो असे वातावरण निर्माण होत आहे. आठ दिवसांपूर्वी तालुक्‍यामध्ये वळीवाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामध्ये गारांनी तालुक्‍याला झोडपून काढले. मात्र, सासवड आणि परिसरात गारा पडल्या नाहीत. पण नीरा परिसरात गारांनी पिकांना आणि ग्रामस्थांना झोडपून काढले. आता मान्सून लवकरच येणार असल्याने शेतकऱ्यांनी शेती कामांना वेग येऊ दिला आहे. जमिनीची मशागत करण्याचे काम ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने केली जात असली तरी इतर कामे शेतमजुरांच्या माध्यमातून करावी लागत आहे. तालुक्‍यामध्ये सध्या पावसाचे वातावरण होत असल्याने शेतकरी सुखावला असला तरी उकाडा जाणवू लागला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)