पुरंदर ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेत फेरबदल

नायगाव -पुरंदर तालुका ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेची बैठक नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सासवड येथे पार पडली. संघटनेत काही फेरबदल करण्यात आले आहेत. यावेळी संगणक परिचालकांना काम करताना ज्या अडचणी येतात त्यावर सविस्तार चर्चा करण्यात आली. टास्क-कन्फर्मेशन, हजेरी व पेमेंटबाबत चर्चा करण्यात आली. सर्वांशी सविस्तर चर्चा करून कार्यकारिणीत बदल करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून प्रिया धसाडे व उपाध्यक्षपदी अमोल नागवडे यांची निवड करण्यात आली. तर सचिव नितीन कोलते व खजिनदार ज्योती सस्ते तर संपर्कप्रमुख दिपाली टेकवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अमोल नागवडे यांनी सर्वांना संघटित करून काम केले जाईल व कोणत्याही संगणक परिचालक यावर अन्याय होणार नाही असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कुदळे यांनी केले तर प्रदीप गिरे यांनी आभार मानले. या वेळी सचिन मेमाणे, प्रवीण कापरे, प्रदीप हांडे, विठ्ठल चव्हाण, जयश्री पापळ आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)