“पुरंदर’ला आता विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा

पुणे – पुरंदर तालुक्‍यातील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी शासनाने 7 गावांमधील 2 हजार 832 हेक्‍टर जागा निश्‍चित केली आहे. यासाठी शासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस (एमएडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. या क्षेत्राचा आराखडा तयार करण्यासाठी आवश्‍यक असणारे मनुष्यबळ पुरविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. विमानतळाच्या उर्वरित जागेवर होणारी विकासकामे ही विमानतळाळा बाधा आणणारी नाहीत, यासाठी ही यंत्रणा काम करेल, अशी माहिती “एमएडीसी’मधील अधिकाऱ्यांनी दिली.

पुरंदर विमानतळासंदर्भात मुंबई येथे “एमएडीसी’ अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी पार पाडली. पुरंदर विमानतळासाठी शासनाने हद्द निश्‍चित केली असून त्याचे सर्व्हे नंबरही जाहीर केले आहे. यामुळे विमानतळाच्या जागेवर शिक्कामोर्तब झाले आहे. विमानतळासाठी शासनने 2 हजार 832 हेक्‍टर जागा निश्‍चित केली असली, तरी प्रत्यक्ष विमानतळासाठी 1,800 ते 2,200 हेक्‍टर जागेची आवश्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे विमानतळाची प्रत्यक्ष जागा उर्वरित जागेचे नियोजन करण्याचे काम “एमएडीसी’कडून सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी नगर रचना विभागासह अन्य विभागातील अधिकाऱ्यांची आवश्‍यकता आहे. या सर्व कामकाजासाठी आवश्‍यक असणारे मनुष्यबळ उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्यक्ष विमानतळ उभारून उर्वरित राहणाऱ्या जागेवर विमानतळाला अडथळा होणार नाही, यावर देखरेख ठेवण्याचे काम ही यंत्रणा करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)