पुरंदरमध्ये विद्यार्थ्यांना 3 लाखांचे गणवेश वाटप

  • सासवड येथील हरेश्वर पतसंस्थेचा उपक्रम

सासवड – कोणतेही राजकीय पाठबळ नाही, आर्थिक स्रोत नाही की, कोणत्याही वरिष्ठ पदावर अथवा कोणत्याही प्रकारच्या देणग्यांच्या माध्यमातून नाही. तर स्वखर्चातून पुरंदर तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तब्बल 3 लाख रुपयांचे गणवेश वाटप केले आहे. एवढेच नाही तर कित्येक विद्यार्थी दत्तक घेणे, शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करणे, गरीब आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत पोशाख आणि महिलांना साड्या वाटप करून तालुक्‍यात नावलौकिक प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे हे उपक्रम राबविणारी मोठी संस्था, कंपनी किंवा कारखाना नव्हे. तर एका छोटेसे भागभांडवल असणाऱ्या पतसंस्थेच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सासवड (ता. पुरंदर) येथे एका छोट्याशा जागेत ही पतसंस्था उभी असून वर्षभर सामाजिक उपक्रम राबविणारे सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप हे या पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. संजय जगताप यांच्या पुढाकारातून पुरंदर तालुक्‍यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नुकतेच तब्बल तीन लाख रुपयांचे गणवेश वाटप करण्यात आले. माहूर, नारायणपूर, जवळार्जुन, यादववाडी, भिवरी, हिवरे, साकुर्डे, पांगारे, पिंपळे, पानवडी आणि इतर शाळेतील होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना हे गणवेश वाटप करण्यात आले आहेत.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि संत सोपानकाका बॅंकेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या हस्ते सासवड येथील पुरंदर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना हे गणवेश नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी नराध्यक्ष मार्तंड भोंडे, भोरचे नगराध्यक्ष उमेश देशमुख, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदिप पोमण, पतसंस्थेचे अध्यक्ष संजयनाना जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक अरुणआप्पा जगताप, नगरसेवक सचिन भोंडे, माजी नगर सेवक रोहित ईनामके, मनोहर पवार,प्राचार्य हनीफ मुजावर, प्रा. केशव काकडे पतसंस्थेचे इतर संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
विविध शाळांतील गरजू, होतकरू 575 विद्यार्थ्यांना 3 लाखांच्या गणवेशाचे वाटप स्तुत्य उपक्रम असून अनेक सामाजिक उपक्रमात पतसंस्थेचा सहभाग आहे. असेच काम तालुक्‍यातील इतर पतसंस्थांनी करावे, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)