पुरंदरमध्ये पाण्याअभावी उसाची पिके धोक्‍यात

खळद- पुरंदर तालुक्‍यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली असून भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर जात असल्याचा फटका उसाच्या पिकाला बसत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मागील वर्षी या भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली होती. पण यंदा मात्र पावसाने पूर्णपणे या भागात पाठ फिरवली आहे. परतीचा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण तालुक्‍यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीत उसाचे पीक जवळपास 12 ते 13 महिन्यांचे झाले असून आता काही दिवसातच हा ऊस गाळपासाठी जाईल. पण आता पाण्याची कमतरता भासू लागली असून नियमाप्रमाणे तोड येईपर्यंत उसाला पाणीपुरवठा करणे शेतकऱ्यांना शक्‍य होणार नाही. यामुळे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
काही महिन्यांपासून उसाच्या पीकाला हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे तर आता दुष्काळाचे सावट पसरले असून पाण्याची कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीत ऊस गाळपासाठी जाणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने या नैसर्गिक संकटाचा विचार करीत या भागातील उसाची पाहणी करून लवकरात लवकर तोड करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाळुंजचे माजी सरपंच सदाशिव चौरे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)