पुरंदरचा ‘डीपीआर’ सुपरफास्ट

आंतरराष्ट्रीय विमानतळ


मोबदल्यासाठी हालचालींना वेग

पुणे- पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचे भूसंपादन करण्यासाठीची अधिसूचना आणि त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना द्यावयाच्या पॅकेजसंदर्भात हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे विमानतळाचा “सर्वकष विकास आराखडा’ (डीपीआर) तयार करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी राज्य सरकारने पुरंदर येथील जागा निश्‍चित केली आहे. या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. या जागेचे ऑब्स्टॅकल सर्व्हेक्षण विमानतळ प्राधिकरणाकडून करून घेण्यात आला होता. त्याचा अहवालही प्राधिकरणाला प्राप्त झाला. प्राधिकरणाकडून हा अहवाल एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आला. त्यास एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने मान्यता दिली. तसेच हे सर्वेक्षण करताना पुरंदर तालुक्‍यातील ज्या परिसरात विमानतळ प्रस्तावित आहे. त्या परिसरातील गावठाण या भूसंपादनातून वगळण्यात आले आहे.

आणीबाणीच्या वेळेस पुरंदर येथील विमानतळामुळे लोहगाव विमानतळावरून लष्कराच्या विमान उड्डाणास काही अडथळे निर्माण होऊ शकतात का, अशी शंका संरक्षण विभागाकडून उपस्थित करण्यात आली होती. अखेर ही शंकेचे निरसण एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडून करण्यात आले. त्यानंतर संरक्षण विभागाने पुरंदर विमानतळाला ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यामुळे डीपीआर तयार करण्याच्या कामाला अधिक गती देण्यात आली आहे.

‘डीपीआर’मध्ये या बाबींचा होणार अभ्यास
विमानतळ प्राधिकरणाकडून डीपीआर तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये जर्मन येथील डार्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीला हे काम देण्यात आले. त्यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुरंदर विमानतळाचा “सर्वंकष विकास आराखडा’ (डीपीआर) तयार करण्याचे काम जर्मनीतील डार्स या कंपनीकडून सुरू आहे. हा आराखडा तयार करताना रन-वे लोकेशन, टर्मिनल, कार्गो सेंटर, पर्यायी रस्ते, विमानतळ आर्थिकदृष्ट्या परवडणारे सुध्दा असले पाहिजे, या सर्वांचा अभ्यास करून आराखडा तयार करण्यात येत आहे.

पुरंदर विमानतळ एका नजरेत


2800 ते 3000 हेक्‍टर
एकूण जागेची आवश्‍यकता


1100 हेक्‍टर
प्रमुख विमानतळासाठी जागा


1250 हेक्‍टर
कार्गो, पार्किंग-बे, हॉटेलसाठी


10 टक्के विकसित जागा
भूसंपादनाच्या मोबदल्यात


14 हजार कोटी (सुमारे)
विमानतळासाठी अपेक्षित खर्च


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)