“पुरंदर’चा अर्थिक अहवाल शासनाला सादर

कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशनसाठी जागांचा विचार

पुणे – पुरंदर येथील विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन, लॉजिस्टिक पार्क आदींचा विचार करून त्यासाठी जागा निश्‍चित करण्यासाठी नेमलेल्या दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

-Ads-

पुरंदर विमानतळासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस विशेष नियोजन समिती म्हणून आणि 2 हजार 832 हेक्‍टर जागा ताब्यात घेण्यास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. यासाठी पुरंदर तालुक्‍यातील सात गावांतील जागा निश्‍चित करण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने यापूर्वीच विमानतळाच्या तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्य अहवाल तयार करण्याचे काम जर्मन येथील डार्स या कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून त्या संदर्भातील अहवाल तयार करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. तसेच विमानतळाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सिंगापूर येथील चांगी एअरपोर्ट या कंपनीला देण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्यांकडून त्यांचे अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे सादर झाले आहेत.

विमानतळ उभारल्यानंतर तो आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी पूरक बाबींचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे. कार्गो हब, लॉजिस्टिक पार्क आदी गोष्टींबरोबरच विमानतळापर्यंत येण्यासाठी मेट्रोचादेखील त्यामध्ये विचार करण्यात आला आहे. राज्य सरकारने विमानतळासाठी 2 हजार 832 हेक्‍टरची हद्दीनिश्‍चित करून दिली आहे. त्यापैकी प्रत्यक्षात कोणत्या जागेवर विमानतळाची उभारणी करावी, ती जागा देखील या आराखड्यात निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच धावपट्टी, पार्किंग बे, टर्मिनल, कार्गो हब अशा विमानतळासाठी आवश्‍यक कामांसाठी किती जागा लागणार आहे, कोणत्या दिशेला काय असणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळामध्ये प्रत्यक्षात कोणती जागा जाणार आहे, तसेच उर्वरित जागेवर कोणते उपक्रम राबवावे, यांचे नियोजन या आराखड्यात करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)