‘पुन्हा 26/11’ या मराठी सिनेमाला ‘सतिया’ अवार्डमध्ये नामांकन !

सुमित पोफळे दिग्दर्शित ‘पुन्हा 26/11’ या मराठी सिनेमाला अलीकडेच दिल्लीच्या सतिया अवार्ड (Social Activist & Talented Indian Award) मध्ये सर्वोत्कृष्ट सामाजिक सिनेमा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशी दोन नामांकने मिळाली आहेत. या पुरस्कारात प्रथमच मराठी सिनेमाला नामांकने मिळाली आहेत

दिग्दर्शक सुमित पोफळे म्हणाले की, “मुंबई मधील ’26/11′ आणि ‘पुणे बॉंबस्फोट’ यावेळी पोलिसांनी केलेली कामगिरी रुपेरी पडद्यावर यावी. यासाठी मी हा सिनेमा तयार केला आहे. पोलिसांच्या कामगिरीला या सिनेमातून सलाम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सिनेमातून शहीद पोलिसांना श्रद्धांजली देण्याचा आमचा मानस आहे. आमच्या पहिल्याच प्रयत्नाला ‘सतिया अवार्ड ‘ने दोन विभागात नामांकने दिल्यामुळे आमचा उत्साहही वाढला आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)