पुन्हा बोट ईव्हीएमकडे… (भाग- २)

ईव्हीएमकडे बोट दाखविण्यास सुरुवात केली ती बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर त्याच्या कारणांची चिकित्सा करण्याऐवजी त्यांनी थेट ईव्हीएमकडे बोट दाखविले. त्यानंतर कॉंग्रेस, आम आदमी पक्षानेही त्यांचीच री ओढली. शिवसेनेसारखा भाजपचा मित्रपक्षही तसेच म्हणू लागला. भाजपचे म्हणणे असे की, सर्व पराभूत पक्षच असा आरोप करीत आहेत.

दुसरीकडे, ईव्हीएम नादुरुस्त होऊ शकते; परंतु त्याद्वारे फसवणूक करणे शक्‍य नाही, असा निवडणूक आयोगाचा दावा आहे. दावे-प्रतिदावे रोज कुणीतरी करीत असल्यामुळे कोण खरे आणि कोण खोटे, हेही कळू नये अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे एकदा मतपत्रिकांचा वापर करून पाहणे योग्यच ठरेल. एवढे करूनही विरोधी पक्ष पराभूत झाले, तर कदाचित ईव्हीएमकडे आणि त्याआडून भाजपकडे बोट दाखविणे तरी थांबेल.

पुन्हा बोट ईव्हीएमकडे… (भाग- १)

मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याची मागणी करणारा कॉंग्रेसचा ज्याप्रमाणे पक्षाची पराभूत वृत्ती दाखवतो, त्याचप्रमाणे “होऊन जाऊ द्या’ या आविर्भावात भाजपनेही त्यासाठी दर्शविलेली तयारी हे भाजपच्या आत्मविश्‍वासाचे चिन्ह ठरते. भाजपने अशी तयारी दर्शवून केवळ आपल्यावरील आरोप करणाऱ्यांची कोंडी केली असे नसून, ईव्हीएम हटविले तरी आम्हीच जिंकणार, असा विश्‍वासही अप्रत्यक्षपणे व्यक्त केला आहे.

कॉंग्रेसच्या महाअधिवेशनात अशी मागणी होणे आणि त्यापाठोपाठ भाजपकडून असे उत्तर दिले जाणे हेही राजकीय डावपेचच असून, कॉंग्रेसचे आव्हान भाजपने स्वीकारले आहे, असा त्याचा अर्थ होतो. शिवाय, मतपत्रिकांद्वारे निवडणुकीस भाजप तयार आहे, असे तातडीने सांगितले गेल्याने प्रचंड गर्दीत झालेल्या कॉंग्रेसच्या महाअधिवेशनाचे महत्त्वही कमी झाले. हा तोटा कॉंग्रेस नेत्यांना समजला नाही. ईव्हीएमवर भाजपने कधी आक्षेप घेतलेच नाहीत, असेही नाही. किरीट सोमय्या यांनीही याविषयी तक्रार केली होती आणि विरोधक त्याकडेही लक्ष वेधतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. पुन्हा बोट इव्हेंकडे ह्याचे दोन्ही भाग वाचण्यात आलेत ह्या मशीनवर घेतलेले आरोप व त्याच्या समर्थनासाठी दिलेले स्पष्टीकरण कागदोपत्री पटण्यासारखे असले तरी हा खुलासा करणारे हे ह्या विषयातील संपूर्ण माहिती असणारे आहेत का ? तसे नसेल तर त्यांनी केलेला विरोधातील अथवा पूरक खुलासा ग्राह्य मानणे हे कितपत यॊग्य ठरेल ? हे ज्ञान आपल्या देशात प्रगत देशातून आयात केलेले आहे व आजच्या परिस्थितीत ह्यात आस्चर्यकारक बदल झालेला आहे ह्याची आपल्याला सुतराम कल्पना नाही हे सत्य मानाने भाग आहे ज्या प्रगत देशात हे ज्ञान निर्माण झाले त्या देशात ह्या मशीनचा उपयोग निवडणुकीत का करण्यात येत नाही ह्याची कोणीही साधी चवकशी करत नाही ह्याचेच आस्चर्य वाटते सध्या निवडणूक हा विषय बाजूला ठेवून ह्या यंत्रात जे आधुनिकीकरण झालेले आहे हे जुने ज्ञान मोडीत काढण्यात आलेले आहे त्याची कारणे शोधणे आवश्यक ठरत नाहीत का ? आज आधुनिक विद्यनांन अंतर्दयनानामुळे मंगल ग्रहावर पाठविलेल्या उपकरणात पृथ्वीवर बसून नाजोगता फेरफार करता येतो हे सत्य आपण स्वीकारलं तर ह्या इलेक्ट्रॉनिक मसचिनमध्ये फेरफार करणे सहज शक्य आहे फक्त ज्याला हे ज्ञान अवगत आहे तोच हे करू शकतो श्री एम सी छागला हे कीव्हलँडला गेले असता निवडणुकीचा निर्णय अगोदरच सांगणार्या इलेक्ट्रॉनिक मशीनचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे नमूद केले आहे हे चूक समजावे का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)