पुन्हा पाकिस्तानात येणार, शिक्षण प्रसार करणार – मलाला

मायदेशातील घराच्या भेटीमुळे मलाला भावूक

पेशावर – पाकिस्तानात स्वात खोऱ्यातल्या आपल्या घरी मलाला युसुफजाईला अश्रु अनावर झाले. पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरल्याबद्दल याच घराजवळ 2012 मध्ये तालिबान्यांनी मलालावर सर्वप्रथम हल्ला केला होता. त्यातून बचावलेल्या मलालाने तेंव्हापासून इतकी वर्षे इंग्लंडमध्येच आश्रय घेतला होता. अवघ्या 20 वर्षाच्या मलाला युसुफजाईने मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरल्याने पाकिस्तानात समाज सुधारकांच्या गळ्यातील ताईत बनली होती. याच कामासाठी तिला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते.

कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये मलाला, तिचे पालक आणि दोन भावंडांनी आज मिन्गोरा येथील माकन बागमधील वंशपरंपरागत घराला भेट दिली. पाकिस्तानच्या माहिती राज्य मंत्री मरियुम औरंगजेब देखील मलालासममवेत उपस्थित होत्या. या भेटीदरम्यान मलालाने आपल्या बालपणच्या मित्र मैत्रिणींची आणि शिक्षकांची भेट घेतली. तब्बल 5 वर्षांनंतर ती या सर्वांना भेटत होती. या भेटीदरम्यान मलालाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वहात होते. आपल्या घराचे दर्शन घेताना तिला आपल्या भावनांना आवर घालणे शक्‍य झाले नाही.

गुरुवारी पाकिस्तानमध्ये आलेल्या मलालाने अगदी थोडा वेळ घरामध्ये घालवला. त्यानंतर स्वात कॅडेट कॉलेजमधील समारंभासाठी ती रवाना झाली. शांगला जिल्ह्यामध्ये मुलींच्या शाळेचे उद्‌घाटन तिच्या हस्ते होणार आहे.

आपले उच्च शिक्षण संपल्यानंतर पुन्हा कायम स्वरुपी पाकिस्तानमध्ये वास्तव्यास येण्याची मलालाची ईच्छा आहे. पाकिस्तानातील प्रत्येक बालकाला शिक्षण मिळावे, यासाठी आपण पुन्हा प्रयत्नशील असणार आहोत. प्रत्येक मुलीला आपले स्वप्न साकार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यासाठी शिक्षण महत्वाचे असेल, असे मलाला म्हणाली.

वयाच्या 11 व्या वर्षापासून मलालाने बीबीसी उर्दूवर ब्लॉग लिहायला सुरूवात केली होते. स्वात खोऱ्यात तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर निर्बंध आणल्याचे तिने जगासमोर आणले होते. त्याबद्दल प्राणघातक हल्ल्यातून बचावलेल्या मलालाला वयाच्या 17 व्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)