पुन्हा तोच डाव ‘माझा अगडबम’

मराठी चित्रपटात नव्य प्रयोगांना सुरुवात झाली त्याच सुमारास म्हणजेच सात – आठ वर्षापूर्वी अभिनेत्री तृप्ती भोईर हिने एक वेगळा प्रयत्न ‘अगडबम’ नावाच्या चित्रपटात केला होता. त्यावेळी तो सर्वत्र नावाजला गेला, आता पुन्हा एकदा तिने तोच प्रयत्न ‘माझा अगडबम’ मधून केला आहे. मात्र इथे पहिल्याची चित्रपटात जी मज्जा आली होती ती येत नाही.

‘माझा अगडबम’ ही कथा प्रचंड जाड असलेल्या नाजुका (तृप्ती भोईर) भोवती गुंफण्यात आली आहे. नाजुका जाडी असल्याने तिला सगळीकडेच हिणवले जाते, तीच्यावर विनोद केले जात असतात. तिचा नवरा रायबा (सुबोध भावे) तिच्यावर प्रेम करत असतो. तिची सासू, वडील आणि काही जवळच्या माणासांनी तिला स्वीकारले आहे.  या अति जाड असण्याचे तिला काहीच वाटत नाही, हे जगणे तिने स्वीकारले आहे.  तिचे वडील (जयवंत वाडकर) पैलवान आहेत, ते एकदा डब्ल्यूडब्ल्यूएफ स्पर्धेमध्ये जखमी होतात आणि वडिलांच्या अपमानाचा बदला घ्यायला ही नाजुका सज्ज होते, पण कुस्तीपटू नसताना ती हे चॅलेंज कसं स्वीकारते, एका महिलेला स्पर्धेत प्रवेश मिळतो का? अशा प्रश्नांची उत्तरे ‘माझा अगडबम’ मध्ये मिळतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती अशी तिहेरी भूमिका करणाऱ्या तृप्ती भोईर यांनी एक पूर्वी एक चांगला प्रयत्न केला होता, आता पुन्हा एकदा त्याच धर्तीवर चित्रपट करायचा म्हणजे दामादाआर कथा हवी हेच त्यांनी लक्षात घेतल्याचे दिसत नाही. ‘माझा अगडबम’ या चित्रपटाच्या कथेत अनेक उणिवा आहेत. नाजूकाचे वजन प्रचंड असून देखील ती बाथरूमच्या खिडकीतून रोज बाहेर पडते, पाईपवरून खाली उतरते या गोष्टी मनाला पटत नाहीत. चित्रपटाचा पूर्वाध चांगला असला तरी उत्तरार्धात कथा रेंगाळते.

कलाकारांच्या अभिनयाच्या बाबतीत सांगायचे तर ना सुबोध भावे यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे, उषा नाडकर्णी, जयवंत वादाक्र, तानाजी गाल्गुंडे यांनी अआपल्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलां आहे. अभिनेत्री तृप्ती भोईरला ऍस्थेटिक्स आणि मेकअप इतका झाला आहे की अभिनयाला फार संधीच मिळालेली नाही.

एखादी व्यक्ती जाड आहे म्हणजे तिच्यावर फक्त विनोदच केले जातात असे चित्रपटात होत असले तरी सामाजात होतेच असे नाही. तसेच अनेक चित्रपटातून हा मुद्दा चांगल्या पद्धातीने हाताळला गेला आहे, तृप्ती भोईर यांनी यावेळी मात्र प्रेक्षकांनी लॉजिक न लावता असा सिनेमा करण्याच्या नादात काहीतरी विचित्र प्रयोग केला असेच नमूद करावे लागेल. तसेच तुमच्या डोक्यात एखादी व्यक्तीरेखा असेल तर त्या भोवती चांगली कथा सुद्धा असायला हवी इथे त्याच कथेचा अभाव दिसतो.

‘माझा अगडबम’ बद्दल थोडाक्यात सांगायचे तर मेकअप, ऍस्थेटिक्सवर मेहनत यासाठी तृप्ती भोईरचे काम नक्कीच कौतुकास्पाद आहे. मात्र इतर आघाड्यावर हा चित्रपट निराश करतो. यामुळे तुम्ही नाजुकाची भेट घ्यायला चित्रपटगृहात जायलाच हवे असे काही नाही.

चित्रपट –  माझा अगडबम
निर्मिती –  तृप्ती भोईर, टी सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा
दिग्दर्शक – तृप्ती भोईर
कलाकार – तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, तानाजी गालगुंडे
रेटिंग – २.५
 
-भूपाल पंडित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)