पुन्हा जागतिक मंदी आली तर परिस्थिती बिकट होईल : आयएमएफने व्यक्त केली चिंता  

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) पुन्हा एकदा जागतिक मंदीचे संकट निर्माण होण्याची शंका व्यक्त केली आहे. जगभरातील देशांवर कर्जाचा भार वाढून विक्रमी 164 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. ही आकडेवारी 2016 पर्यंतची असून जागतिक मंदीचा काळ पुन्हा आला तर त्याला तोंड देणे अवघड ठरणार असल्याची भीती आयएमएफने व्यक्त केली आहे.

आयएमएफने स्वतःच्या राजकोषीय निरीक्षण अहवालात कर्जाचा आकडा जागतिक जीडीपीच्या 225 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे नमूद केले. तर मध्यम उत्पन्न गटाच्या देशांचे कर्ज त्यांच्या जीडीपीच्या 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. कर्जाचा भार वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आयएमएफच्या अनुमानावर देखील प्रभाव पडण्याची शक्यता आहे.  नुकतेच  आयएमएफने 2018 आणि 2019 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 3.9 टक्के दराने वृद्धिंगत होण्याचा अनुमान व्यक्त केला होता. आगामी वर्षांमध्ये पतधोरणातील कठोरतेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडू शकतो असेही आयएमएफने म्हटले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)