पुन्हा कर्नाटकातील सरकार पाडण्याचा प्रयत्न होईल – सिद्धरामैय्या

म्हैसुर – लोकसभा निवडणुकीनंतर भाजपकडून पुन्हा ऑपरेशन कमल सुरू होईल आणि कर्नाटकातील जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न होईल असे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी म्हटले आहे. तथापी या प्रयत्नांतही भाजप यशस्वी होऊ शकणार नाही असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला आहे.

राज्यातील आघाडीचे सरकार अत्यंत स्थीर असून त्याला कोणताही धोका नाही असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की भाजप हे सरकार पुन्हा पाडण्याचा प्रयत्न करील यात शंका नाही त्यासाठी ते पुन्हा आमदारांना प्रलोभने दाखवून फोडाफोडीचा प्रयत्न करतील. असेच प्रयत्न करून त्यांनी या आधीही कर्नाटकात ऑपरेशन कमल राबवले होते. पण त्यात त्यांना साफ अपयश आले पुन्हा त्यांनी तसे प्रयत्न केल्यास त्यांना पुन्हा तशाच स्थितीला तोंड द्यावे लागेल असा दावाही सिद्धरामैय्या यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)