पुन्हा एकदा शाळेत “तो’ वर्ग भरला

वाघोली – केसनंद (ता. हवेली) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री जोगेश्वरी विद्यालयात 18 वर्षांनी परत एकदा दहावीचा वर्ग भरला आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊन गेला. 2000 ते 2001 या कालावधीत दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा केसनंद येथील जोगेश्वरी विद्यालयास भेट देऊन, शाळेच्या आणि गुरुजनांच्या आठवणींनी उजाळा दिला. यावेळी शिकवणारे शिक्षक, विद्यार्थी यांच्या भेटीने वातावरण भावूक झाले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. एन. के. निंबाळकर हे होते. कार्यक्रमासाठी या शाळेची काही काळ सेवा
केलेले शिक्षक आंधळे, वाकचौरे, जाधव, वीर, मुरादे, पोतदार आणि पाटील मॅडम, शाळेतील सध्या
कार्यरत असलेले प्रभारी मुख्याध्यापक कोलते आणि शिक्षक जाधव, शिर्के मॅडम, सोनवणे मॅडम, सचिन हरगुडे, नवनाथ बहिरट, शिवाजी हरगुडे, नवनाथ सातव, अमोल हरगुडे, योगेश लोखंडे, यशवंत बांगर, नवनाथ शिंदे, उत्तम शिंदे, अनिल हरगुडे, गणेश नलावडे, युवराज इंगळे, तुषार भोरडे, वसंत गावडे, संतोष गावडे, दिनेश हेंद्रे, शंकर वाल्हेकर,भाऊसाहेब धुमाळ, संदीप हरगुडे, गजानन हरगुडे, अनिल जाधव, नितीन माने, उमेश हरगुडे, योगेश हरगुडे, उषा येवले,सुनीता हरगुडे,ज्योती ढोरे,रखमा हरगुडे,सविता पालकर, वैशाली गायकवाड,दैवशीला गळगे,लता ढोरे,राणी केसवड,अर्चना हरगुडे, वर्षा हरगुडे, उषा हरगुडे, रुपाली हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सतीश हरगुडे, सचिन सातव, संजय हरगुडे, गणेश हरगुडे, आशा शिंदे, सुनीता ढवळे, माधुरी हरगुडे, सरस्वती हरगुडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश झांबरे यांनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)