पुन्हा एकदा विराटाच बेस्ट ! कसोटी क्रमवारीत अव्वल

नवी दिल्ली: भारताचा कर्णधार विराट कोहली याला यंदाचा इंग्लंड दौरा भलताच पावला आहे. मागील दौऱ्यात कसोटी सामन्यात चांगली कामगिरी न करू शकणारा विराट पहिल्याच कसोटीमध्ये खोऱ्याने धावा वसूल करताना दिसला. त्याने दोन्ही सामने मिळून २०० धावा केल्या. तर तिसऱ्या कसोटी सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजी करत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

पहिल्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करूनही भारताला विजय मिळवून देण्यात विराट आणि भारतीय संघाला अपयश आले. लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला चांगली फलंदाजी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला अव्वल स्थान गमवावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)