पुन्हा एकदा बोल्ड रोल करण्यासाठी विद्या सज्ज

दिग्दर्शक प्रदीप सरकार आणि विद्या बालन ही हिट जोडी पडद्यावर पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाली आहे. 14 वर्षांपूर्वी प्रदीप सरकार यांच्या “परिणिता’मध्ये विद्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा हा पहिलाच रोल खूप संस्मरणीय होता. यामध्ये विद्या आणि सैफ अली खान ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आता प्रदीप सरकार यांच्या आगामी “नीती बिनोदिनी’मध्ये विद्या एका वेश्‍येचा रोल साकारणार आहे. ही एक बायोपिक असणार आहे. 19 व्या दशकातील बिनोदिनी या प्रतिभावान वेश्‍येला गिरीश चंद्र घोष यांनी थिएटरमध्ये काम करण्याची संधी दिली होती.

नाटकात काम करायला लागल्यावर बिनोदिनीने वेश्‍याव्यवसाय सोडून दिला होता. त्यानंतर जवळ जवळ दशकभर ती कोलकातातील एका प्रसिद्ध थिएटरसाठी नाटकामधून काम करत होती. वेश्‍या पासून ते एक सुप्रसिद्ध थिएटर अभिनेत्रीपर्यंतचा बिनोदिनीचा प्रवास “नीती बिनोदिनी’मधून साकारला जाणार आहे. प्रदीप सरकार यांनी या रोलसाठी विद्याला विचारणा केली आहे. विद्याचा आवाज बिनोदिनीच्या रोलसाठी एकदम परफेक्‍ट आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हा सिनेमा “अमर कथा’ या बिनोदिनीच्या चरित्रावर आधारलेला असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)