नुकताच रिलीज झालेला राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्त्री’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. हे पाहता निर्मात्यांनी ‘स्त्री’चा सिक्वेल बनवण्याची घोषणा केली आहे.

‘स्त्री’ चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजयन तर निर्मिती राज निदिमोरु आणि कृष्णा डिके यांनी केले आहे. गेल्या शुक्रवारीच रिलीज झालेल्या स्त्री चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली असून घोडदौड सुरूच आहे. याचे यश पाहता आता या चित्रपटाचा सिक्वेल बनविण्याबाबत निर्मात्यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत.

याबद्दल बोलताना दिग्दर्शक दिनेश विजयन म्हणाले की, चित्रपट आताच रिलीज झाला असल्याने त्याच्या सिक्वेलबाबत लगेच काहीही बोलू शकत नाही. परंतु, स्त्री चित्रपटाची कथा पुढे सुरु ठेवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या चांगल्या कामगिरीमुळे आमचाही आत्मविश्वास वाढला आहे. ‘स्त्री-२’ च्या चित्रपटाच्या कथेची सुरुवात पहिल्या चित्रपटाच्या अंतापासूनच होणार आहे. त्यामुळे या चित्रपटात प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सिक्वेलमध्ये मिळतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ‘स्त्री -२’च्या सिक्वेलमध्येही राजकुमार राव व श्रद्धा कपूर असणार असून २०१९ च्या वर्षाअखेर पर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)