पुनावळेतील अपघातात तरुणाचा मृत्यू

पिंपरी – भरधाव वेगाने चालेल्या टॅंकरने एका कारला पाठीमागून धडक दिल्याने कार चालकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार (दि.14) रोजी पहाटे तीनच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर पुनावळे येथे घडला.

कार चालक विनायक वसंत चाळके (वय-25, रा. दादर, मुंबई) याचा अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणी दर्शन घाडी, (वय-26 रा. परेल, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या नातेवाईंकासोबत देवदर्शनासाठी निघाले होते. या दरम्यान मुंबई-बेंगलोर हायवेवर एका टॅंकरने पाठीमागून त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कार पुढे असलेल्या बसला धडकली. विनायक चाळके यांचा मृत्यू झाला. तर त्याचे नातेवाईक किरकोळ जखमी झाले. अपघात झाल्यानंतर टॅंकर चालकाने तेथून पळ काढला. पुढील तपास उपनिरीक्षक अशोक गवारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)