पुनर्वसन करूनही पथारीवाले रस्त्यावरच

अतिक्रमण विभागाकडून नोटीसा : परवाना रद्द होण्याची शक्‍यता

पुणे – पुणे महापालिकेच्या वडगावशेरी येथील भाजी मंडई/ओटा मार्केट येथे स्थानिक फेरीवाल्यांचे पुनर्वसन करूनही त्याचे उल्लंघन करणाऱ्या दीडशे फेरीवाल्यांना अतिक्रमण विभागाने नोटीस बजाविली आहे. पुनर्वसनासाठी जागा देऊनही रस्त्यावर व्यवसाय करताना आढळून आल्याने त्यांचे प्रमाणपत्र (लायसेन्स) रद्द करण्यात येण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने शहरातील सर्व फेरीवाल्यांची बायामेट्रिक नोंदणी करून त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचे जवळच्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. वडगावशेरी येथील भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन महापालिकेने बांधलेल्या गाळ्यांमध्ये करण्यात आले होते. तरीही, हे गाळे रिकामे ठेवून संबंधीत व्यावसायिक पुन्हा रस्त्यावरच व्यवसाय करताना आढळून आले. अशा व्यावसायिकांविरोधात ही जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे.

वडगावशेरीसह शहराच्या इतरही काही भागांत पुनर्वसनासाठी जागा देऊन त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या दीडशे व्यावसायिकांना नोटीस बजाविण्यात आल्याचे अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. त्यावर खुलासा करण्याची संधी व्यावसायिकांना असून, तो समाधानकारक नसल्यास त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते, असेही जगताप म्हणाले. महापालिकेतर्फे आगामी काळातही पुनर्वसन झाल्यानंतर वेगळ्या ठिकाणी व्यवसाय करताना आढळून येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)