पुनर्वसनाच्या मुद्‌द्‌यावरून नगरसेविका संतप्त

अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात घातला गोंधळ

पुणे – अतिक्रमणमुक्त पदपथ मोहिमेत विस्थापित झालेल्या पारधी समाजाच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी करत भाजप नगरसेविका राजश्री काळे यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या कार्यालयात शुक्रवारी गोंधळ घातला.

-Ads-

महापालिका आणि पोलिसांनी केलेल्या अतिक्रमणमुक्त पदपथ मोहिमेदरम्यानच्या कारवाईत पुणे स्टेशन येथील पदपथावर वास्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले. यावेळी काहींना मारहाण करण्यात आली आहे. या नागरिकांना त्यांचे साहित्य द्यावे आणि त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करत काळे यांनी गोंधळ घातला. यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाल्याने भाजपच्या काही नगरसेवकांनी काळे यांची समजूत घातली. त्यानंतर प्रकरण शांत झाले. परंतु या घटनेमुळे महापालिका आणि पोलिस आयुक्तांनी कधी नव्हे ते एकत्र येउन सुरू केलेल्या अतिक्रमणमुक्त पुणेच्या मोहिमेला खो बसण्याची चिन्हे आहेत.

पारधी कुटुंबातील महिलांसह निंबाळकर यांच्या कार्यालयात नगरसेविका काळे आल्या. कारवाईवेळी संबंधित महिलांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. कारवाईत जप्त केलेले साहित्य परत द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
कायद्याने त्यांचे “एसआरए’ योजनेत पुनर्वसन करता येणार नाही, असे निंबाळकर यांनी सांगताच काळे संतापल्या आणि त्यांना रडू कोसळले. या नागरिकांबद्दलचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कार्यालयातून जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

वातावरण तणावग्रस्त झाल्याने कार्यालयाबाहेरील सुरक्षा रक्षकांसह अन्य मंडळीही आतमध्ये आली. काही मिनिटांतच भाजपचे नगरसेवक दीपक पोटे, योगेश समेळ, विजय शेवाळे निंबाळकर यांच्या कार्यालयात आले. त्यांनी काळे यांना शांत केले. तसेच निंबाळकर यांच्याशी चर्चा करून नगरसेविका काळे यांना सोबत घेऊन कार्यालयातून बाहेर पडले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)