पुनर्रचित बांबू धोरण शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नासाठी पूरक ठरेल

नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या बांबू लागवड धोरणाच्या पुनर्रचनेमुळे महाराष्ट्रातील शेतक-यांना मोठा लाभ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने हे धोरण पूरक ठरेल अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. टीएसके रेड्डी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास दिली.

डॉ. रेड्डी म्हणाले, वर्ष २०१८-१९ साठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये बांबू विकासासाठी १२९० कोटींची तरतूद करण्यात आली असून बांबू लागवड धोरणाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या धोरणास लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अपेक्षित असून देशातील सर्व राज्यांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर परिषदेचे आयोजन करण्यात आले. बांबू लागवड पुनर्रचना धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  राज्य शासनाची पूर्णपणे तयारी असल्याचे  डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)