पुनरागमन करणे अवघड होते – कृणाल पांड्या

सिडनी: पहिल्या सामन्यात तब्बल पंचाव्वन धावा दिल्यानंतर आगामी सामन्यांमध्ये यशस्वी पुनरागमन करणे खूप अवघड होते असे वक्तव्य भार विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू कृनाल पांड्यायाने केले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात युझुवेंद्र चहालच्या जागी कृणाल पांड्याला संघात सामील करण्यात आले होते. मात्र, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीला लक्ष करताना त्याच्या चार षटकांमध्ये तब्बल 55 धावा वसूल केल्या होत्या. या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला हा सामना 4 धावांनी गमवावा लागला होता.त्यामुळे कृणालच्या निवडीवरुन संघव्यवस्थापनावर बरीच टिका करण्यात आल्यानंतरही दुसऱ्या सामन्यात कृणालला संघात स्थान मिळाले आणि त्याने दुसऱ्या सामन्यात आपल्या चार षटकांमध्ये 26 धावा देत ग्लेन मॅक्‍सवेलला बाद करत किफायती गोलंदाजी केली होती. यावेळी दुसऱ्या सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय आला आणि सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्याची भारताची संधी वाया गेली. तर, तिसऱ्या सामन्यात कृनालने दुसऱ्या सामन्यातील आपली लय कायम ठेवत 36 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या तब्बल चार फलंदाजांना बाद केले. त्यामुळे त्याने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दितील सर्वोत्तम गोलंदाजी केली.

त्याच्या या कामगिरी बद्दल बोलताना कृणाल म्हणला की तुम्ही एखाद्या मालिकेतील पहिलाच सामना खेळताय आणि त्यात तुमच्या गोलंदाजीला इतक्‍या खराब पद्धतीने मारले जाते. त्यावेळी तुम्ही मानसीक रित्या संपुर्णपणे खचलेले असता त्यामुळे सामन्यात पुनरागमन करणे तुअमच्या दृष्टीने खूप अवघड असते. त्यातच तुम्ही या स्तरावरील सामना जास्त खेळलेला नसाल तर त्यातून पुनरागमन करणे खूप अवघड होउन बसते.

मात्र, पहिल्या सामन्यानंतर मी स्वताःला समजावून सांगत होतो की मला पुनरागमन करायचे आहे. स्वताःला थोडावेळ द्यायला हवा त्या शिवाय पुनरागमन करणे अवघड असल्याचे ही मी समजलो होतो. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मी ठरवलेल्या योजने प्रमाणे गोलंदाजी करत गेलो आणि यशस्वी ठरलो. त्याचाच फायदा मला तिसऱ्या सामन्यातही झाला. असेही कृणाल पुढे म्हणाला.

यावेळी पुढे बोलताना तो म्हणला की, अश्‍या प्रकारे पुनरागमन करणे हे आनंददायी असते. ज्या विरोधकांनी तुम्हाला संपुर्णप्रकारे उध्वस्त केलेले असते अश्‍या विरोधी संघाला पुढील सामन्यातच उध्वस्त करूण तुम्ही पुनरागमन करणे हे खूप समाधानकारक असते. यातून मला शिकायला मिळाले की, क्रिकेटच्या या स्वरूपात तुम्ही नवोदित गोलंदाज असाल की फलंदाज तुम्हाला खूप शांत आणि सहनशील असायला हवे त्या शिवाय तुम्हाला यात चांगली कामगिरी करता येणार नाही.
एक खेळाडू म्हणून तुम्हाला क्रिकेटच्या या प्रकाराचे स्वर्तूप लक्षात घेतले पाहिजे. कधी तुमच्या गोलंदाजीला फटके लागतील तर कधी तुम्ही बळी मिळवाल त्यामुळे तुम्ही मिळालेल्या यशाने हुरळून न जाता आगामी सामन्यांच्या दृष्तीने काम करायला हवे अथवा तुमच्या गोलंदाजीला फटके पडल्यानंतर लागलीच निराश न होता ठरवलेल्या योजने प्रमाणे गोलंदाजी करणे गरजेचे आहे. तेंव्हाच तुम्ही या प्रकारात तुमचे स्थान टिकवू शकाल. असेही त्याने यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)