पुनरागमनासाठी कसून प्रयत्न करणार-बॅंक्रॉफ्ट

कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. पर्थ येथे परतल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना बॅंक्रॉफ्ट म्हणाला की, माझ्या “त्या’ कृत्याचा मला आयुष्यभर पश्‍चात्ताप होत राहील.सॅंडपेपरबाबतही मी खोटेच बोललो होतो. त्या परिस्थितीत मला काय करावे ते कळेना.

परंतु माझा वापर करू दिल्याबद्दल मला खेद होतो. आणि ऑस्ट्रेलियाच्या संघातील बहुमोल स्थान मी विनामूल्य गमावले, जे स्थान कदाचित पुन्हा मला कधीच मिळणार नाही. मात्र मी यापूर्वी कधीच बॉल टॅम्परिंगमध्ये सहभागी झालो नव्हतो आणि भविष्यात तर तसा प्रश्‍नच येणार नाही. आता परतीचा रस्ता खडतर आहे हे तर सरळच दिसते. तरीही मी ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमनासाठी कसून प्रयत्न करेन.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)