पुनरागमनानंतर मरेची चमक 

ब्रिस्बेन – मागील काही वर्षात सतत दुखापतग्रस्त असलेल्या अँडी मरेनेऑस्ट्रेलियन ओपनच्या धर्तीवर ब्रिस्बेन इंटरनॅशनल स्पर्धेत पुनरागमन केले असून तो किती काळ तंदुरुस्ती टिकवून ठेऊ शकतो याचा त्याला अंदाजा नाही.. त्यामुळे योग्य स्पर्धा निवडून तो जास्तीत जास्त काळ तंदुरुस्त राहू इच्छितो आहे. या स्पर्धेत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या जेम्स डकवर्थचा 6-3, 6-4 असा पराभव केवरून पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे.

सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, मागील 18 महिन्यांपासून दुखापतीमुळे कोर्टच्या आत – बाहेर असणे माझ्यासाठी सर्वात कठीण काम होते. या काळात माझ्या कामगिरीत काही चढ -उतार देखील आले. त्यामुळे मला पुन्हा मैदानात आल्यावर तंदुरुस्तीचा विचार करत जबाबदारीपूर्वक खेळावे लागेल. या मैदानावर पुनरागमन करून पुन्हा चांगला खेळ केल्याने मी खुश आहे. सामन्याचे सुरुवात खराब केल्यावर विरोधी खेळाडूवर सहज विजय मिळाल्याने आत्मविशास वाढला असून पुढील सामन्यासाठी मला त्याचा फायदा होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)