पुनरागमनाचा नदालचा निर्धार

न्यूयॉर्क: गुडघ्याच्या दुखापतीने डोके वर काढल्यामुळे गतविजेत्या राफेल नदालला अमेरिकन ओपनमधील डेल पोट्रोविरुद्धच्या उपान्त्य लढतीतून माघार घ्यावी लागली. या दुखापतीने गेल्या दहा वर्षांपासून नदालला सतावले आहे. त्याची कारकीर्द त्यामुळे संपुष्टात येण्याचा धोका नसला, तरी मोक्‍याच्या वेळी ही दुखापत उफाळते आणि नदालचा नाईलाज होतो.
डेल पोट्रोविरुद्ध पहिले दोन सेट गमावताना नदालला आपण यापुढे खेळू शकणार नसल्याची जाणीव झाली आणि त्याने माघार घेतली. यंदाच्याच ऑस्ट्रेलियन ओपनमधील उपान्त्यपूर्व लढतीतही मेरिन सिलिचविरुद्ध दुखापतीने त्रस्त केल्यावर नदालला माघार घ्यावी लागली होती. परंतु या वर्षांत दुसऱ्यांदा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील सामन्यातून माघार घ्यावी लागल्यानंतरही नदालची झुंजार वृत्ती कमी झालेली नाही.
आणखी अनेक ग्रॅंड स्लॅम मुकुट जिंकण्याचा निर्धार व्यक्‍त करताना नदालने आपली जिद्द दाखवून दिली. नदालने आतापर्यंत 17 ग्रॅंड स्लॅम मुकुट जिंकले असून 20 विजेतेपदाच्या फेडररच्या विश्‍वविक्रमापासून तो केवळ तीन मुकुटांनी मागे आहे. माझ्या शैलीवर अनेकांनी टीका केली आहे. या शैलीमुळे माझी कारकीर्द लवकर संपुष्टात येईल, असेही अनेकांचे म्हणणे आहे. परंतु मी माझ्याच पद्धतीने खेळणार आहे आणि यशही मिळविणार आहे, असे नदालने सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)