पुतीन यांचे अभिनंदन करणे ट्रम्प यांना पडले महागात

स्वपक्षीय खासदारांनीच उठवली टीकेची झोड
वॉशिंग्टन – रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतीन यांची नुकतीच फेरनिवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करणारा संदेश अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवला असून आपण लवकरच त्यांच्याशी दोन्ही देशांमधील वादाच्या विषयांवर चर्चा करणार आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांचा हा संदेश त्यांना चांगलाच महागात पडला असून ट्रम्प यांच्या या टिप्पणीवर त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी जोरदार टीका केली आहे.

सत्ताधारी पक्षाचे संसद सदस्य सेन जॉन मॅक्केन आणि आर अरिज यांनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर टीका करताना म्हटले आहे की ज्यांनी खोट्या मार्गाने निवडणूक जिंकली अशा हुकुमशहाचे अभिनंदन करायला ट्रम्प हे काही मुक्त जगाचे नेते नाहीत. रशियाने अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला आणि त्यांनी अलिकडेच ब्रिटन मधील आपल्या एका माजी हेराला विषप्रयोग करून ठार मारण्याचे कृत्य केले आहे. ट्रम्प हे अध्यक्ष या नात्याने कोणाचेही अभिंनदन करू शकतात पण त्यांनी पुतीन यांचे केले आभिनंदन मात्र आक्षेपार्ह आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पुतीन यांच्या निवडीवर भाष्य करताना खुद्द अमेरिकन सरकारच्या प्रवक्‍त्या हीथर नौअर्ट यांनी म्हटले होते की काही जणांना मतदानासाठी पैसे देऊन आणि विरोधकांना धमकाऊन किंवा त्यांना कारागृहात पाठवून लढवलेल्या निवडणूकीत पुतीन विजयी होणे ही काही आश्‍चर्याची बाब नाही. रशियन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पद्धत चुकीची होती, त्यात विरोधकांना समान संधी देण्यात आली नाही आणि पुतीन यांचेच या निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण होते असा अहवाल युरोपातील एका संस्थेने दिला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. अमेरिकन सरकारचाच प्रवक्ता पुतीन यांच्या निवडीवर शंका उपस्थित करीत असताना स्वत: अध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र पुतीन यांचे निवडीबद्दल अभिनंदन करणे ही बाब वादग्रस्त ठरली आहे. दरम्यान व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्या सारा हकबी सॅंडर्स यांनी मात्र ट्रम्प यांच्या या कृत्याचे समर्थन केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांनी गेल्यावेळीही पुतीन जेव्हा निवडून आले होते त्यावेळीही त्यांचे असेच अभिनंदन केले होते. बाहेरील देशात ज्या काही घडामोडी होतात त्यावर अमेरिकेचे काही नियंत्रण नसते असेही त्यांनी यावेळू नमूद करीत ट्रम्प यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)