पुतणीवर बलात्कार केल्याप्रकरणी चुलत्यास 15 वर्षे सक्तमजुरी

राजगुरुनगर-मार्च 2015साली जुन्नर तालुक्‍यातील सहा वर्षीय मुलीला मोबाईलमधील अश्‍लील चित्रफीत दाखवून बलात्कार करणाऱ्या चुलत्यास येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांनी 15 वर्षे सक्तमजुरी व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याची माहिती अशी मार्च 2015मध्ये वडज येथील खंडोबा मंदिरामध्ये दर्शनासाठी आरोपी चुलत्याने त्याच्या 6 वर्षीय पुतणीला स्कुटीवरून नेले होते. तिथे गेल्यानंतर मंदिर परिसराच्या जवळपास आरोपीने त्याच्या मोबाईलमधील अश्लीश चित्रफित दाखवून तिच्यघावर अत्याचार केला. घरी आल्यानंतर मुलीला त्रास होऊ लागल्याने तिला आईने दवाखान्यात नेले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने नारी समता मंच पुणे व बाल हक्क कृती समिती पुणे यांच्याशी संपर्क साधला. नारी समता मंचच्या समुपदेशक आशुमती देशपांडे यांनी हा प्रकार ऐकल्यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या आईसह पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात जाऊन महिला पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पडोळे यांना हा प्रकार सांगितला. महिला पोलीस उपनिरीक्षक पडोळे यांनी पीडित मुलीच्या आईची तक्रार जबाब व नारी समता मंचच्या समुपदेशक आशुमती देशपांडे यांचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. हा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने जुन्नर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. जुन्नर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रावसाहेब खेडेकर यांनी तपास करून आरोपीला अटक केली होती. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या कोर्टात सुरू होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अरुण ढमाले यांनी आठ साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश ब्रम्हे यांनी आरोपी चुलत्यास दोषी धरले. विविध कलमाखाली आरोपीला 15 वर्षे सक्तमजुरी व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याबरोबरच दंडाच्या रकमेपैकी 15 हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे. जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन देशमुख यांनी कोर्ट कामकाज पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
102 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)