पुण्याहून मुंबईत जाणारे सर्व मार्ग ‘होल्ड’ वर 

  • सागर येवले 

पुणे : मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे मुंबईतील संपूर्ण वाहतूक ठप्प झालेली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सातारा, पुणे येथील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आलेली आहे. उर्से, कुसगाव आणि खालापूर टोल नाक्याजवळ महामार्ग पोलीसांचा बंदोबस्त आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना माघारी फिरण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

 

मुंबईतील वाहतूक ठप्प झाल्यामुळे थोड्या काळानंतर तेथून बाहेर पडणाऱ्या वाहनांना रस्ता मोकळा मिळावा यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)