पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या काही ट्रेन रद्द

पुणे, दि.25 – मुंबईत सायन व कुर्ला स्थानकादरम्यान असणाऱ्या अडीच मीटर रुंदीचा जुना पादचारी पुल रविवारी क्रेनच्या सहाय्याने पाडण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यात पुणे-मुंबई सीएसएमटी पुणे-सिंहगड एक्‍स्प्रेस, पुणे-मुंबई सीएसएमटी पुणे डेक्कन क्विन एक्‍स्प्रेस रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत; तर मुंबई-बंगळुरु उद्यान एक्‍स्प्रेस मुंबईतून सकाळी 8.10 ऐवजी 10 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सोलापूर विभागांतर्गत येणारी वम्बोरी व राहुरी रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या देखभाल दुरुस्ती करिता ब्लॉक घेण्यात आला. या कामामुळे पुणे-निजामाबाद पुणे पॅसेजर शनिवारपासून दि.16 जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)