पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणला “सीएसआर’

पालिका शाळा, वस्त्यांसह आरोग्य सेवेच्या प्रकल्पांचा समावेश

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पुणे महापालिकेसाठी सीएसआर (सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबीलीटी) योजनेंतर्गत सहा प्रकल्प मिळणार आहेत. मुंबई येथे होणाऱ्या राज्य शासनाच्या सीएसआय योजनांच्या महापरिवर्तन मेळाव्यात या योजनांसाठीचे करार केले जाणार आहेत. या प्रकल्पांमध्ये महापालिका शाळांमधील मुलांसाठी पोषण आहार, मोबाईल वस्ती क्‍लिनिकसह झोपडपट्टीमधील भिंतींच्या आकर्षक रंगसंगतीच्या कामाचा समावेश असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

“मेक इन इंडिया’ अंतर्गत देश-विदेशातील कंपन्यांनी महाराष्ट्रात व्यवसाय सुरू करण्यासाठी “मेक इन महाराष्ट्र’ प्रकल्प राबविला होता. त्याचवेळी देश-विदेशातील मोठ्या कंपन्यांनी सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबीलीटी (सीएसआर) अंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्येही नागरिकांसाठीच्या योजना राबविण्याचे आवाहन केले होते. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून पुणे शहरासाठी सहा प्रकल्प मिळणार आहेत. त्यात बेंगलुरू येथील “अक्षयपात्र’ ही संस्था पालिकेच्या शाळांमधील 25 हजार मुलांसाठी शालेय पोषण आहार मध्यवर्ती किचनच्या माध्यमातून पुरविणार आहे. याशिवाय, परिमल स्वास्थ संस्था शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल मेडीकल युनिट उपलब्ध करून देणार आहे. तर, रुबेल नागी आर्ट फाउंडेशन ही संस्था पालिकेच्या 100 शाळांमध्ये कला वर्ग घेणार असून शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आकर्षक भिंती रंगविण्याचा उपक्रम राबविणार आहे. याशिवाय, टाटा ट्रस्टकडून पालिकेच्या 100 शाळांमध्ये “वॉश’ ही सुविधा देण्यात येणार असून, टाटा फाउंडेशनच्या माध्यमातून बर्निंगहॅम सिटी आणि पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट न्युट्रीशन प्रकल्प राबविला जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)