पुण्यासह 13 जिल्ह्यांत आता “जीत’ प्रकल्प

“क्षयरोगमुक्त महाराष्ट्र’चा संकल्प : रुग्णांची नोंद बंधनकारक

पुणे – “क्षयरोगमुक्त (टीबी) महाराष्ट्र’ करण्याच्या मोहिमेत आता खासगी डॉक्‍टरांना सामावून घेणारा “जीत’ प्रकल्प पुण्यासह राज्यातील 13 शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे खासगी डॉक्‍टरांकडे उपचार घेणाऱ्या टीबी पेशंटची नोंद तसेच त्यांची माहिती मिळणे शक्‍य होणार असून त्यामुळे पेशंटना योग्य त्या उपचारांची दिशा देखील मिळू शकणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यासह देशात टीबीच्या पेशंटची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यात येत असून, “टीबी’च्या पेशंटची आरोग्य विभागाकडे नोंद व्हावी, यासाठी हा आजार “नोटिफायबल डिसीज’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. परंतु, सुमारे 20 ते 30 टक्के पेशंटची सरकारी आरोग्य विभागाकडे नोंद आहे. उर्वरित 60 ते 70 टक्के पेशंट हे खासगी हॉस्पिटलकडे उपचार घेत आहेत. परंतु, त्यांच्यापैकी 10 ते 20 टक्के डॉक्‍टरांकडे उपचार घेणाऱ्या पेशंटची नोंद सरकारच्या आरोग्य विभागाकडे आहे. त्या करिता या आजाराबाबत योग्य उपचार, त्याच्या नोंदी, समन्वय राखला जावा यासाठी आता आरोग्य विभागाने महाराष्ट्रात हा प्रकल्प राबविण्याचे धोरण ठरविले आहे. त्यामध्ये पुण्यासह कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई, रायगड, सोलापूर, ठाणे, विरार, वसई भाईंदर, डोंबिवली, भिवंडी यांचा समावेश आहे. तसेच उपक्रमांतर्गत 23 जिल्ह्यांध्ये सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील विविध शहरांमध्ये सार्वजनिक वाहनांनी लाखो नागरिक प्रवास करीत असतात. या प्रवाशांच्या माध्यमातून संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती असते. त्यावेळी टीबीचा आजार असलेल्या पेशंटचा संसर्ग पसरला तर त्यामुळे अनेकांना आजार वाढण्याची भीती असते. हा आजार बरा होऊ शकतो. मात्र त्यासाठी नियमित उपचार घेण्याची गरज आहे. परंतु, बहुतांश पेशंट टीबीचे उपचार व्यवस्थित घेत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढून त्यातून पेशंटचा मृत्यू होण्याची शक्‍यता असते, असे एका सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)