पुण्यासह लोणावळा स्टेशनला लवकरच लागणार ‘वर्ल्ड क्लास’चे कोंदण

 

सोलापूरसह 90 स्थानकांचा होणार कायापालट


उत्तरप्रदेशातील सर्वाधिक 7 स्थानकांचा समावेश


प्रवाशांना विमानतळाप्रमाणे मिळणार सुविधा

पुणे – शिक्षण, पर्यटन, उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पुणे रेल्वे स्टेशनचा लवकरच कायापालट होणार आहे. याशिवाय उपनगरीय असलेल्या शिवाजीनगर, लोणावळा या स्थानकांनाही झळाळी मिळणार आहे. या स्टेशन्सवर “वर्ल्ड क्लारस’ सुविधा देण्याच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने पावले उचलली आहेत.

देशातील 90 स्थानकांवर येत्या काळात “वर्ल्ड क्लाास’ सुविधा देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2018-19 च्या अर्थसंकल्पातून हा प्रस्ताव मांडला होता. या यादीमध्ये इगतपुरी, सोलापूर आणि वर्धा या रेल्वे स्थानकांचादेखील समावेश आहे. एखाद्या विमानतळावर ज्या सुविधा प्रवाशांना दिल्या जातात, तशाच रेल्वे स्थानकांवरदेखील दिल्या जाणार आहेत, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्‌वीटमध्ये म्हटले आहे. सध्याच्या रेल्वे स्थानकांचे पुनर्निर्माण करून तेथे अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा मानसदेखील रेल्वेमंत्र्यांनी व्यक्ता केला आहे. यात काही स्थानकांचा विकास संबंधित विभाग तर काहींचे पुनर्निर्माण रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेल्या आयआरएसडीसी या कंपनीमार्फत होणार आहे.

रेल्वे स्थानक विकास करण्याच्या या यादीमध्ये गुजरातमधील गांधीनगर, सुरत, अहमदाबाद, राजकोट, वडोदरा तर गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकाचे पुनर्निर्माण होणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे. याशिवाय, आसाम, आंध्रप्रदेश, बिहार, चंडीगढ, छत्तीसगड या राज्यांतील महत्त्वाची स्थानके, दिल्लीतील सफदरगंज आणि आनंद विहार, हरियाणातील अम्बाला, शिमला, जम्मूमावी, रांची, म्हैसुरू, केरळमधील 3 स्थानके, जबलपूर, ओडिशातील 2, पॉंडिचेरी, जयपूरसह राजस्थानातील 3, चेन्नई आणि तिरुचिरापल्ली, वरंगल (तेलंगणा), उत्तरप्रदेशात लखनौ, वाराणसीसह 7, डेहराडून, हरिद्वार- उत्तरांचल, पश्चि्म बंगाल- 3 अशा स्थानकांचे “रिडेव्हलपमेंट’ करून तेथे “वर्ल्ड क्ला्स’ सुविधा दिल्या जाणार आहेत.

या सुविधांवर दिला जाणार भर
ज्या 90 रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे, तेथे सीसीटीव्ही, वाय-फाय, स्थानक इमारतीची पुनर्बांधणी, पिण्याचे शुद्ध पाणी, वॉटर एटीएम, एलईडी लाईट्‌स, लिफ्ट, सरकत्या पायऱ्या (एस्कॅलेटर्स), स्टीलच्या खुर्च्या, स्वच्छ उपहारगृहे उपलब्ध केली जाणार आहेत. याशिवाय वेटिंग रूम, विश्रामगृह, स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारला जाणार आहे. यासाठीच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)