पुणे – देशाची एक प्रमुख राष्ट्रीयीकृत बॅंक आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधील सर्वांत जुनी बॅंक, अलाहाबाद बॅंकेने दि. 24 एप्रिल 2018 रोजी आपला 154 वा स्थापना दिवस साजरा केला. बॅंकेने आपली सेवायात्रा 1865 मध्ये सुरू केली होती आणि दीड शतकांपर्यंत देशाची सेवा केली आहे.
ह्या प्रसंगी देशभरात बॅंकेने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले. बॅंकेकडून क्रीडा, सांस्कृतिक व कला क्षेत्रांमध्ये आपला आगळा ठसा उमटवणाऱ्या तसेच आपले आयुष्य सामाजिक कार्यांसाठी व्यतीत करणाऱ्या व्यक्तींचा नझरूल मंच, कोलकाता इथे सत्कार केला गेला. बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उषा अनंतसुब्रह्मण्यन म्हणाल्या की, बॅंक खरंतर वारसासंपन्न परंतु आधुनिक दृष्टिकोन ठेवणारी बॅंक आहे. काळासोबत चालताना बॅंकेने शताब्दींना ओलांडून प्रगती साध्य केली आहे. बॅंकेने विविध ग्राहक केंद्रित उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांवर लक्ष केंद्रित केलं आहे.
पुणे मंडल कार्यालय आणि त्याअंतर्गत येणाऱ्या शाखांनी स्थापना दिवस उत्साहात साजरा केला. मांजरी शाखेने रक्तदान शिबिर आणि लक्ष्मी रोड, औंध व नाशिक शाखांनी मोफत हेल्थ चेकअप कार्यक्रम ग्राहकांसाठी आयोजित केले होते.
धानोरी शाखेद्वारा शाळेतील मुलांसाठी पुस्तकांचे व जलगाव शाखेद्वारा अनाथालयातील मुलांसाठी मिठाईचे वाटप केले गेले. कनकापूर शाखेमध्ये वृक्षारोपण केले गेले. ह्या प्रसंगी मंडलाधीन औरंगाबाद, अहमदनगर, जखणगाव, कोल्हापूर, वास्को, वाळुंज, हिंजवडी, जळगाव, उस्मानाबाद, तळेगाव आदी शाखांद्वारा ग्राहक चर्चासत्राचे आयोजन केले गेले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा