पुण्याला सर्वोत्तम शहर करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री फडणवीस : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे भूमिपूजन

पुणे – पुणे महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे दुसरे शहर आहे. या शहराच्या विकासासाठी गेल्या 20 वर्षांत केवळ आश्‍वासने आणि चर्चाच झाली. मात्र, गेल्या चार भाजपने शहराच्या विकासासाठी या चर्चेतील योजना प्रत्यक्षात आणत आहे. शहराला सर्वोत्तम शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पुण्यात दिले.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, स्थानिक आमदार योगेश टिळेकर, आमदार जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, भाजप शहाराध्यक्ष योगेश गोगावले, महापालिका आयुक्त सौरभ राव यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शहराच्या विकासासाठी गेल्या 20 वर्षांत अनेक मोठ्या विषयावर केवळ चर्चा झाल्या. मात्र, केंद्र व राज्यशासनाने गेल्या 4 वर्षात त्या प्रत्यक्षात मान्यतेत आणल्या, त्यात समान पाणी योजना, मेट्रो, रिंगरोड, कचऱ्यापासून वीज निर्मिती, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नदीसुधार योजना, पीपीपी तत्त्वावरील शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो योजना अशा योजनांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे शहाराचे भविष्यातील चित्र बदलण्यास मदत होणार आहे.

महापौर म्हणाल्या, हा शहरातील सर्वाधिक मोठा रस्ता होणार आहे. या कामाची निविदा तीन वेळा काढण्यात आली. त्यात वारंवार निविदांवरून वाद झाला. मात्र, भाजपने दिलेला पारदर्शकतेच्या आश्‍वासनाचे पालन करत गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले हे रुंदीकरणाचे काम मार्गी लागले आहे. हा रस्ता शहरासाठी आदर्शवत ठरणार असून या रस्त्यावर वाहने, पार्किंग, पदपथ तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण असणार आहे. या रस्त्यामुळे सातारा, सोलापूर तसेच मुंबई कडे जाणाऱ्या वाहनांना फायदा होणार असून या रस्त्यावरील वारंवार होणारी कोंडी फोडण्यास मदत होणार आहे.

टिळेकर म्हणाले, 20 वर्षानंतर या रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे. या रस्त्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात आले. 15 वर्षानंतर भाजपने हे रुंदीकरणाचे काम मार्गी लावले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. 1997 मध्ये या भागाचा महापालिकेत समावेश आला. मात्र, या रस्त्यावर 45 जणांचे बळी गेले. मात्र, तत्कालीन आघाडी सरकारने या रस्त्यासाठी केवळ 5 कोटी रुपये दिले. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमारे 200 कोटींचा निधी मंजूर केला. त्यामुळेच हा रस्ता होऊ शकणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)