पुण्याला ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्‍ट्रीसीटीशिवाय’ पर्याय नाही – गडकरी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – देशात 22 टक्के ऍटोमोबाईल ग्रोथ आहे. पुण्यात त्याचे प्रमाण अधिक आहे. पुणे सध्या ज्वालामुखीच्या खाली असून, प्रदुषण ही नवीन समस्या आहे. त्यामुळे या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर आणायचे असेल तर तीन वर्षानंतर 80 हजार कोटींची एक लेन तयार करावी लागेल. तरच राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडी होणार नाही. परंतू, आता ते कोणालाच शक्‍य नाही. त्यामुळे वेगवेगळ्या टेक्‍नोलॉजीकडे वळलो पाहिजे असे सांगत पुण्याला ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्‍ट्रीसीटीशिवाय’ पर्याय नाही असे मत रस्ते, महामार्ग व जहाज वाहतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीने नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या कामांचे भुमीपुजन रस्ते, महामार्ग व जहाज वाहतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग – 4 वरील चांदणी चौकातील उड्डाणपुल आणि सौदर्यीकरण, पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग – 50 च्या खेड, सिन्नर विभागातील पाच बायपास मार्गाची कोनशिला अनावरण आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, दीलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, भिमराव तापकीर यासह आमदार, नगरसेवक आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)