पुण्याबाबत निर्णयावेळी डावलले जाते

आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची सरकारवर टीका

पुणे – पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये स्मार्ट सिटी, पुणे महानगर विकास प्राधिकरणाबाबत निर्णय घेताना विधानसभा आणि विधानपरिषदेतील आमदारांना डावलून “असंस्कृत’ पध्दतीने निर्णय घेतले जात असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्‍त्या, आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी केली.

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता, वृध्दाश्रमांना बंद केलेले अनुदान सुरू करणे, प्रत्येक जिल्ह्यात रुग्णांसाठी “मॉडेल’ संस्था उभारणे, बाललैगिंक अत्याचार, शिक्षकांकडून विद्यार्थीनींचे होणारे शोषण, बालकलाकारांची सुरक्षिततेचा प्रश्‍न, शिक्षणातील गुणवत्ता यासह जातपंचायतीचा समाजात वाढत असलेला हस्तक्षेप असे विविध लक्षवेधी प्रश्‍न विधिमंडळात उपस्थित केल्याची माहिती यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक, हत्या करणे हे प्रकार वाढत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मातोश्री वृध्दाश्रम योजनेचे अनुदान लवकरात लवकर सुरू करावे. बालात्कार, लैंगिक अत्याचारावर जातपंचायतीकडून होणारी पिळवणूक, त्यांचा वाढता हस्तक्षेप असे लक्ष्यवेधी प्रश्‍न मांडल्यावर संबधीत विभागाकडून त्याची दखल घेत त्यावर कार्यवाही करण्याचे अश्‍वासन देण्यात आले. तारांकित प्रश्‍नामध्ये गोऱ्हे यांनी बारामती येथील बोगस ग्रामपंचायतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच शेतकऱ्यांना पाईपलाईनद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाने घेतलेल्या निर्णय, पिकांवर औषध फवारणी करताना शेतकऱ्यांचा झालेला मृत्यु, या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)