पुण्यात 12.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पुणे – पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात तीन दिवसांपासून ढग जमा होत आहेत. सोमवारी सकाळपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामान होते व गारठाही कायम होता. राज्यात सर्वांत कमी तापमान आज नगर येथे 10.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मंगळवारी राज्यात ढगाळ वातावरणासह थंड व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. पुण्यातही आज तापमान 12.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी आहे.

दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती, पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात हलके ढग आहेत. यामुळे राज्याच्या किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी सरासरीच्या जळपास असल्याने थंडी टिकून आहे. हिंदी महासागर व दक्षिण बंगालच्या उपसागरात गुरुवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचे प्रवाहदेखील सक्रिय असल्याने दक्षिण भारतात पाऊस पडणार आहे. राज्याच्या दक्षिण भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)