पुण्यात स्वाइन फ्लूचा उद्रेक

File Photo

आणखी 14 संशयितांचा मृत्यू: 31 रुग्ण अत्यवस्थ

पुणे – शहरात स्वाइन फ्लूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वाईन फ्लूमुळे यावर्षी आतापर्यंत 10 मृत्यू झाल्याचे पालिकेने यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, आता आणखी 14 संशयितांचा मृत्यू झाल्याचे पालिका आरोग्य विभागाने म्हटले आहे.

-Ads-

पुणे शहरात “एचवन-एनवन’ची अनेकांना मोठ्या प्रमाणावर लागण झाली असून आतापर्यंत एकूण 175 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 63 रुग्णांना उपचारांती घरी सोडले आहे, तर 54 रुग्ण वॉर्डमध्ये आणि 31 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. तीन महिलांचे मृत्यू झाल्याचे पालिकेने ऑगस्टमध्येच जाहीर केले होते. त्यानंतर शनिवारी (दि. 15) पालिकेच्या आकडेवारीनुसार त्यात 7 जणांची भर पडून हा आकडा 10वर पोहचला. आता 14 संशयित मृत घोषित करण्यात आले आहेत. मात्र, या 24 पैकी 10 जणांचा मृत्यू स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अन्य नागरिकांच्या मृत्यूचे कारण पालिकेकडून शोधण्याचे काम सुरू आहे. या 24 पैकी 15 जणांची नावे आरोग्य विभागाने जाहीर केली असून त्यापैकी 9 जण पुरुष आहेत तर 6 महिलांचा समावेश आहे. या 24 जणांमध्ये 12 जण हे पालिका हद्दीतील, तर उर्वरित 12 जण हे हद्दीबाहेरचे होते. यामध्ये नगर, चाकण, मावळ, जुनी सांगवी, चिंचवड, लोणावळा येथील रुग्ण होते.

मध्यमवर्गीय बळींची संख्या अधिक
पालिका आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शकांनुसार लहान मुले, गरोदर महिला व वृद्धांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सध्या मृत झालेल्या व्यक्‍तींमध्ये 40 ते 58 या वयोगटातील स्त्री व पुरुषांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याही वयोगटातील नागरिकांनी काळजी घेण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)