पुण्यात सरीवर…सर

रस्ते चिंब : लोणावळ्यात सर्वाधिक : कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

पुणे – शहरात मागील आठ दिवसांपासून श्रावणसरी बरसत असून, रविवारची सकाळही श्रावणसरींनी सुरू झाली. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी भिजण्याचा आनंद घेतला. तर, काहींची धांदल उडाली. पुढील दोन दिवस पावसाच्या सरी होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यातही पावसाचा जोर वाढला असून, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस झाला असून लोणावळा येथे सर्वाधिक 70 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामध्ये महाबळेश्‍वर येथे 60 मिमी पावसाची नोंद झाली असून, कर्जत, माणगाव आणि माथेरान येथे प्रत्येकी 50 मिमी पाऊस झाला. महाड, मंडणगड, पौड-मुळशी येथे 40 मिमी पावसाची नोंद झाली असून, मराठवाडा आणि विदर्भातील औरंगाबाद, चिखलदरा, उमरगा, वाशीम येथे 10 मिमी पाऊस झाला आहे.

अजूनही समाधानकारक पाऊस नाही
नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होऊन दोन महिने झाले. परंतू, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच मध्य महाराष्ट्रातही काही गावांमध्ये ही परिस्थिती आहे. तर दुसरीकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने तरी मराठवाडा आणि विदर्भावर कृपादृष्टी करावी आणि तहान भागेल एवढा तरी पाऊस व्हावा, अशी प्रार्थना केली जात आहे.

सुट्टीचा आनंद घरातच
मागील आठ दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे घराबाहेर पडायचे की अशा प्रश्‍न नागरिकांसमोर पडत आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस आणि रक्षाबंधन असल्यामुळे खरेदी किंवा कामानिमित्त बाहेर पडण्याचे नियोजन अनेकांनी केले. परंतु, सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली. दुपारी दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा असल्यामुळे नागरिकांनी घरात बसून रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यात धन्यता मानली. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठेत फारशी गर्दी पहायला मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)