पुण्यात वाद होतच राहतात, त्याचे टेन्शन घेऊ नका

पालकमंत्री बापटांची मुख्यमंत्र्यांकडे सफाई
प्रभात वृत्तसेवा

पुणे – पुण्यात पक्षाचे नवे “कारभारी’ खासदार संजय काकडे यांनी नुकतेच केलेले वक्तव्य, त्यानंतर निर्माण झालेला गणेशोत्सवातील वाद त्यावर भाष्य करताना “पुण्यात चर्चा अन्‌ वाद होतच असतात, टेन्शन घेऊ नका. फक्त तुमच्या कानावर ते घालावे लागतात.’ अशी सफाई पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. अचानकच आलेल्या या वाक्‍यांनी क्षणभर उपस्थित चक्रावले. ते आणखे पुढे काय बोलतात, याकडे लक्ष लागले असताना बापट यांनीही तो विषय तेथेच थांबवला.

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने आयोजित उपक्रमांच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यंदाच्या गणेशोत्सवाचे नेमके कितवे वर्ष आहे? गणेशोत्सवाचे जनक कोण? गणेशोत्सवानिमित्त महापालिकेने तयार केलेल्या बोधचिन्हात नेमके कोणाचे छायाचित्र वापरणार, या विषयांवर नेमके ते बोलले की, खासदार संजय काकडे यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चेबाबत ते बोलले यावर मात्र उपस्थितांमध्ये काहीवेळ संभ्रम निर्माण झाला.

ब्रिटीशांच्या काळात स्वातंत्र्यासाठी, धर्मजागृतीसाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनतेला संघटीत करण्याचे काम लोकमान्य टिळक आणि भाऊ रंगारींनी केले. या उत्सवात सर्व जाती-धर्म-पक्षांचे लोक, आबालवृद्ध उत्साहात सहभागी होतात. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव समाजाला जोडणारी, संस्कार करणारी सांस्कृतिक चळवळ झाली आहे, असेही बापट म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)