पुण्यात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकवटले ; एफआरपीचा एक रुपया सुद्धा दिला नसल्याचा आरोप

पुणे : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पुण्यातील अलका चाैकापासून ते साखर संकुल पर्यंत पायी भव्य माेर्चा काढण्यात आला. दरम्यान राज्यभरातील शेतकरी सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस विकला असून अनेक कारखान्यांकडून त्यांना अद्याप एफआरपीचा एक रुपया सुद्धा दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. एफआरपी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखाे रुपये कारखान्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऊसाची एफआरपी मिळावी, अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्याची एफआरपी प्रश्नावर फसवणूक केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी वेळ पडल्यास राज्याची तिजोरीही खाली करू अशी घोषणा केली होती. त्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही आता शोध घेत आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना टोले लगावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)