पुण्यात मान्सूनपूर्व “चैतन्यसरी’

उकाड्यावर फुंकर : तापमानही घसरल्याने नागरिकांना दिलासा
सिंहगड रोड, कात्रज, कोथरुड परिसरात पाऊस

पुणे – मान्सूनपूर्व पावसाने गुरूवारी सायंकाळी थोडासा उकाड्याने त्रस्त पुणेकरांवर थंडाव्याची फुंकर घातली आहे. सिंहगड रोड, कात्रज तसेच कोथरुड परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मध्यवस्तीमध्येही हलक्‍या पावसाने हजेरी लावली. दरम्यान, यामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा काही वेळासाठी खंडीत झाला होता. त्यामुळे दिवसभर उकाड्याने त्रस्त नागरिकांत सायंकाळी अचानक चैतन्यदायी वातावरण पसरले.

गेले काही दिवसांपासून पुणे शहरातील तापमान वाढत होते. गुरूवारीदेखील तापमान हे 40.8 अंश सेल्सिअसवर पोहचले होते. सायंकाळी चारच्या सुमारास आकाशात ढग जमू लागले व वारे वाहु लागले. काही वेळातच जोरदार पावसाला सुरूवात झाली. सिंहगड रोड, कात्रज परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडत होता. कोथरुडमध्येही पावसाने सायंकाळी साडेसातच्या सुमारास हजेरी लावली. अर्धा तास या परिसरात पाऊस पडत होता. मध्यवस्तीत ढगांचा गडगडाट आणि विजा चमकत होत्या. पण, पावसाच्या तुरळक सरी झाल्या.

धायरी, वडगाव बुद्रूक परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. यात काही जणांनी पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद लुटला. सखल भागात साचलेल्या पाण्यातून वाहने नेताना चालकांना कसरत करावी लागत होती. त्यातच वाहने संथगतीने पुढे सरकत असल्याने कोंडीचाही सामना करावा लागला. पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. कात्रज आणि कोथरुडमध्येही पावसामुळे काही भागातील वीज बंद झाली. पण, पाऊस थांबल्यानंतर अनेक भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. सिंहगड रोड परिसरात काही ठिकाणी झाडपडीच्याही घटना घडल्याचे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)